शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची संख्या अर्ध्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:41 IST

दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला सर्वाधिक फटका ईशान्येकडील राज्यांचे पुरस्कार वाढले

बालाजी देवर्जनकरनागपूर : दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. पूर्वी पावणेचारशे शिक्षक या पुरस्काराने गौरविले जात होते. आता मात्र ही संख्या दीडशेपेक्षाही कमी होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला २९ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जायचे. आता नव्या निकषानुसार राज्याच्या वाट्याला केवळ ६ पुरस्कार येणार आहेत. पुरस्कारसंख्या घटविल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाने नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात अनेक फेरबदल केले असून आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यासह काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या ११ मोठ्या राज्यांना प्रत्येकी ६ पुरस्कार दिले जातील. तर आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालंड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या १८ राज्यांना प्रत्येकी ३ पुरस्कार दिले जातील. केंद्रशासित प्रदेशामध्ये केवळ दिल्लीला दोन तर उर्वरित अंदमान निकोबार, चंडीगड, दादरा नगर हवेली, दीव दमण, लक्षद्वीप, पुडुचेरीना प्रत्येकी १ एक पुरस्कार मिळेल. केंद्र सरकारद्वारे संचालित केंद्रीय व नवोदय विद्यालय, सीबीएससी शाळांना १७ पुरस्कार दिले जाणार आहेत. असे एकूण १४५ पुरस्कारांचे वितरण केंद्र सरकार या शिक्षक दिनापासून करणार आहे. पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. गतवर्षीपर्यंत देशातील ३७८ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जायचे. आता ही संख्या अर्ध्यापेक्षा खाली आल्याने देशातील तब्बल २३३ शिक्षकांना पुरस्कारांपासून मुकावे लागणार आहे.सध्या पुरस्कार संख्येत झालेले बदल हे छोट्या राज्यांच्या पथ्यावर पडले असून, मोठ्या राज्यांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. गोवासह अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना पूर्वीपेक्षा प्रत्येकी एक पुरस्कार वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र २३, उत्तर प्रदेश २२, पश्चिम बंगाल २०, तामिळनाडू १९, आंध्रप्रदेश १५, गुजरात, केरळ १०, कर्नाटक ९, मध्यप्रदेश, राजस्थान ८, आसाम, हरयाणा, ओरिसा, उत्तराखंड ५, छत्तीसगड, पंजाब ५, बिहार ३, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड १ असे पुरस्कार कमी झाले आहेत. त्यामुळे ८ राज्यांना प्रत्येकी एक पुरस्काराचा फायदा झाला असला तरी २१ राज्यांचे १७५ पुरस्कार मात्र हिरावून घेतले आहेत.पहिल्यांदाच घटली पुरस्काराची संख्या१९५८-५९ सालापासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जातात. त्यात १९६७-६८, १९७६, १९९३, २०००-०१, २००७, २०१४मध्ये अनेक बदल झाले आहेत. पण आतापर्यंत झालेले बदल हे पुरस्कारांच्या संख्येत किंवा पुरस्कार राशी वाढविण्यासाठी झाले आहेत. या वर्षी होवू घातलेले बदल पहिल्यांदा पुरस्कारांची संख्या कमी करण्यासाठी होत आहेत.मानव संसाधन विकास मंत्री महाराष्ट्राचे असताना...सध्या केंद्रात मानव संसाधन विकासमंत्री महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर आहेत. केंद्रात महाराष्ट्रीयन व्यक्ती मंत्री असतानाच महाराष्ट्रील सर्वाधिक पुरस्कार कमी व्हावेत, याबाबत शिक्षण वतुर्ळातून आश्चर्यासह संतापही व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक