फसवणुकीचा आकडा २० कोटींवर

By Admin | Updated: August 11, 2014 00:48 IST2014-08-11T00:48:17+5:302014-08-11T00:48:17+5:30

दुप्पट किमतीत शेती विकून देतो या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या २० च्या घरात असून तब्बल २० कोटी रुपयांनी मंगेश रामकृष्ण साठे रा. सावध या ठकबाजाने लोकांची फसवणूक

The number of fraud is 20 crores | फसवणुकीचा आकडा २० कोटींवर

फसवणुकीचा आकडा २० कोटींवर

आरोपी फरारच : शेती खरेदी-विक्रीचे प्रकरण
आकोली (वर्धा) : दुप्पट किमतीत शेती विकून देतो या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या २० च्या घरात असून तब्बल २० कोटी रुपयांनी मंगेश रामकृष्ण साठे रा. सावध या ठकबाजाने लोकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. एवढेच नव्हे तर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचेसुद्धा सहा लाख रुपये बुडविले आहेत. साठे याने पत्नी, भाऊ, आईच्या नावे शेती खरेदी केली तर झोपडीत राहणाऱ्या १० ते १२ लोकांच्या नावे लाखोंचे सोने बँकेत तारण म्हणून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ठगबाज मंगेश साठे याने मुंबईच्या एका कंपनीकरिता आपण शेती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे अनेकांना सांगितले होते. त्याच्या सांगण्यानुसार व तक्रारकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीतील कागदावरून पोलिसांनी मुंबई येथील विक्रमसिंग सूर्यवंशी यांच्याशी सपंर्क साधला असता त्यांना या व्यवहाराची कुठलीही माहिती नसल्याचे समोर आले. वर्धा येथील राजकुमार कन्हैयालाल कलवानी यांना शेती विकून दुप्पट रक्कम करून देतो, असे आमिष देत मंगेश साठे याने ३५ लाखांनी फसविले. खरांगणाचे ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात बँक खाते तपासणे, पैसा कुठे गुंतवला, स्थावर मालमत्ता कुठे व कुणा-कुणाचे नावे खरेदी केली या बाबी तपासण्यात आल्या.
साठे याने बँक आॅफ इंडियाच्या खरांगणा शाखेतून सोने तारण योजनेत आठ लाख रुपये उचलले आहे. या बदल्यात त्याने झोपडीत राहणाऱ्या गरीब विश्वासू अशा १० ते १२ लोकांच्या नावांवर सोने गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या नावे १.७० हेक्टर आर., आईच्या नावे १.६५ हेक्टर आर. व भावाचे नावे १.२१ हेक्टर आर. शेती विकत घेतली.
गौरव भास्कर पोलशेट्टीवार रा. राजुरा यांना किसना दौलत दुर्गे रा. आंजी यांनी ४५ लाख रुपयांत शेती विकली. सदर शेत सर्व्हे नं. ९० चे बनावट कागदपत्र तयार करून विक्रमसिंग सूर्यवंशी रा. मुंबई यांना ती जमीन ५६ लाख रुपयांत विकल्याचे दाखवले. परत तीच शेती विक्रमसिंह यांनी पुष्पा सुनील झाटे रा.सेलू जि. परभणी यांना चार लाखांत विकल्याचा पुरावा आहे. ५६ लाखांत विकत घेतलेली शेती चार लाखात विकणे अशक्यच आहे. यासाठी खरांगणा पोलीस पुष्पा झाटे यांच्याशी संपर्क साधणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: The number of fraud is 20 crores