कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:18+5:302021-01-13T04:18:18+5:30
नागपूर : मागील दोन आठवड्यामधील कोरोनाबाधितांची व मृतांची तुलना केली असता, बाधितांची व मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. ...

कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या वाढतेय
नागपूर : मागील दोन आठवड्यामधील कोरोनाबाधितांची व मृतांची तुलना केली असता, बाधितांची व मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. २० ते २६ डिसेंबरदरम्यान २,३६९ रुग्ण व ४९ रुग्णांचे मृत्यू झाले. ३ ते ९ जानेवारीदरम्यान ३,०२० रुग्ण पॉझिटिव्ह तर ६१ रुग्णांचा जीव गेला. रविवारी ४३१ नव्या रुग्णांची भर पडली तर ९ रुग्णांचे बळी गेले. बाधितांची एकूण संख्या १,२८,००१ तर मृतांची संख्या ४,०२१ वर पोहचली आहे.
कोरोनाच्या नवा स्ट्रेनबाबत सर्वत्र खबरदारीचे उपाय घेतले जात असताना, नागपूर जिल्ह्यात मात्र चाचण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज ३,४८६ चाचण्या झाल्या. यात ३,१८६ आरटीपीसीआर तर ३०० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश आहे. ॲन्टिजेन चाचणीतून २८, आरटीपीसीआर चाचणीतून ४०३ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. बाधितांमध्ये शहरातील ३५०, ग्रामीणमधील ७८ तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ३ मृत्यू आहेत. रविवारी ४१९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,१९,४२५ झाली. सध्या ४,५५५ रुग्ण उपचाराखाली असून, १,४१६ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत.
-नागपूरचा मृत्यूदर ३.१४ टक्के
नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१४ टक्के आहे. आज ४१९ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.३० टक्क्यांवर पोहचले आहे. चाचण्यांच्या तुलनेत १२.३६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
-दैनिक संशयित : ३,४८०
-बाधित रुग्ण : १,२८,००१
_-बरे झालेले : १,१९,४२५
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४,५५५
- मृत्यू : ४,०२१