लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आहे.भारतीय रस्ते परिषदेच्या तांत्रिक प्रदर्शनात असलेल्या इको स्मार्ट वॉल पॅनलच्या स्टॉलवर या रेडीमेड भिंती पाहता येतात. याचे संचालक वरुण सचदेवा यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, फ्लाय अॅश आणि सिमेंटने हे पॅनल वॉल तयार केले जातात. ते आपसात जोडून भिंत उभारली जाते. या भिंती हलक्या आणि मजबूत आहे. यामुळे रेती, सिमेंट आणि विटांचा खर्च वाचतो. प्लास्टर करायची गरज नाही. पुटिंग करून किंवा थेट रंगही मारता येतो. एकूण घराच्या बांधकामात तब्बल २० टक्के खर्च अशा भिंतींमुळे वाचतो. शिवाय या भिंती चार इंचीच्या असल्याने जागाही भरपूर उपलब्ध होते. त्यामुळे या भिंती आता काळाची गरज ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.सेव्ह माऊंटेन व रेन वॉटर हार्वेस्टिंग