शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आता नागपूर जि.प., मनपा शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:43 IST

शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे. एका शाळांमध्ये हे केंद्र उभारण्यासाठी अंदाजे ३ ते ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या चौकसपणा व सृजनशील कलागुणांना मिळणार वाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय विद्यार्थ्यांमधील चौकसपणा व सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान व गणित विषयाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने समग्र शिक्षा अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील १७ शाळांचा समावेश आहे. एका शाळांमध्ये हे केंद्र उभारण्यासाठी अंदाजे ३ ते ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व मनपा शाळा अशा एकूण १७ शाळांमध्ये हे सायन्स सेंटर उभारण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा असो की महापालिकेच्या, विज्ञानाच्या प्रयोगशाळेचा अभाव आहे. प्रयोगशाळांच्या अभावी या शाळांमधील विद्यार्थ्यांना आवड व इच्छा असतानाही विज्ञान विषयातील विविध प्रयोग करण्यापासून वंचित राहावे लागते. या सायन्स सेंटरचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. शिक्षण विभागाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील १७ शाळांची निवड केली आहे. या प्रत्येक शाळांमध्ये ही सायन्स लॅब उभारण्यात येत आहे. यासाठी राज्यस्तरावरुन राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेअंती क्युरीऑन एज्युकेशन प्रा.लि. ठाणे यांची पुरवठादार कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे. शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारल्यानंतर त्या शाळेतील संबंधित गणित व विज्ञान विषय हाताळणारे शिक्षक, गटसाधन केंद्रांतर्गत कार्यरत, विज्ञान व गणित विषय साधनव्यक्ती यांना नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील साहित्याव्दारे विद्यार्थ्यांना शिकवणे, साहित्याची हाताळणी तसेच साहित्याच्या उपयोगितेबाबतचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात येणार आहे. या केंद्रासाठी मंजूर शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या शाळांमध्ये सायन्स केंद्राची निर्मितीतालुका                          शाळेचे नावनागपूर (ग्रा.)                 जि.प.उ.प्रा.शाळा बोरीहिंगणा                          जि.प.उ.प्रा.शाळा बीड गणेशपूरकामठी                         जि.प.उ.प्रा.शाळा महालगावकाटोल                         न.प.शाळा क्र.२नरखेड                         जि.प.उ.प्रा.शाळा मोहगांव भदाडेसावनेर                         जि.प.उ.प्रा.शाळा सिल्लेवाडासावनेर                         जि.प.उ.प्रा.शाळा वलनी क्र.२कळमेश्वर                     जि.प.उ.प्रा.शाळा उबाळीउमरेड                         जि.प.उ.प्रा.शाळा हेवतीपारशिवनी                    जि.प.उ.प्रा.शाळा माहुलीभिवापूर                       जि.प.उ.प्रा.शाळा महालगावकुही                            जि.प.उ.प्रा.शाळा चापेगडीरामटेक                       जि.प.उ.प्रा.शाळा आजनीमौदा                           जि.प.उ.प्रा.शाळा चाचेरनागपूर                       मनपा, सुरेंद्रगड हिंदी प्राथ. शाळानागपूर                       मनपा, संत कबीर हिंदी प्राथ. शाळानागपूर                      गरीब नवाज उर्दू स्कूल

टॅग्स :scienceविज्ञानNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळा