‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून कळेल पाणी ‘लिकेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:11 AM2019-08-10T11:11:48+5:302019-08-10T11:13:58+5:30

‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘सीटीएमडी’तर्फे (क्लिअर टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॉडेलिंग डिव्हिजन) यासंदर्भात संशोधन करुन ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे.

Now Leakage of Water will find out through software | ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून कळेल पाणी ‘लिकेज’

‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून कळेल पाणी ‘लिकेज’

Next
ठळक मुद्दे‘नीरी’त अनोखे संशोधन‘जीएसआय’ आधारित ‘सॉफ्टवेअर’ केले तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये ‘लिकेज’ची समस्या ही अनेकदा डोकेदुखी ठरते. यामुळे दूषित पाणीपुरवठा होतो व ‘लिकेज’ला शोधणे हे एक मोठे आव्हानच ठरले. परंतु आता चक्क ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून हे ‘लिकेज’ शोधता येणार आहे. ‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट) ‘सीटीएमडी’तर्फे (क्लिअर टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड मॉडेलिंग डिव्हिजन) यासंदर्भात संशोधन करुन ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले आहे. चांगल्या पाणीपुरवठा प्रणालीसाठी तयार करण्यात आलेले ‘सॉफ्टवेअर’ हे ‘जीएसआय’ तंत्रज्ञानावर आधारित आहे व याला ‘रिस्क-पायनेट’ असे नाव देण्यात आले आहे. अनेक महानगरपालिकांमध्ये याची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे तर नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारी कंपनी ‘ओसीडब्ल्यू’नेदेखील ‘नीरी’तून हे तंत्रज्ञान घेतले आहे. ‘सीटीएमडी’च्या वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.आभा सारगांवकर व वरिष्ठ वैज्ञानिक आशिष शर्मा यांनी हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे.
जुन्या शहरी भागात असलेल्या पाईपलाईनमध्ये जर ‘लिकेज’ झाले तर त्याला ठीक करणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी संबंधित पाईपलाईनच्या क्षेत्रात खोदकाम करावे लागते. अनेकदा तरीदेखील ‘लिकेज’ सापडत नाही. परंतु ‘जीएसआय’ आधारित ‘रिस्क-पायनेट’च्या माध्यमातून खराब झालेली पाईपलाईन, ‘लिकेज’ इत्यादी सहजपणे शोधल्या जाऊ शकते. दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हे ‘सॉफ्टवेअर’ अतिशय उपयुक्त आहे, अशी माहिती डॉ.सारगांवकर यांनी दिली.
नागरिकांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचावे या उद्देशाने ‘सीटीएमडी’ने हे ‘सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. याचे चांगले परिणाम समोर येत आहेत. महानगरपालिकेमध्ये पाणी वितरण प्रणालीला जर आणखी प्रभावी करायचे आहे तर हे ‘सॉफ्टवेअर’ अतिशय उपयोगी आहे. देशभरातील अनेक महानगरपालिकांनी ‘नीरी’ला या ‘सॉफ्टवेअर’ची माहिती मागितली आहे, असे आशिष शर्मा यांनी सांगितले.

हैदराबादमध्ये वापरले ‘सॉफ्टवेअर’
‘रिस्क-पायनेट’चा उपयोग सर्वात अगोदर हैदराबाद जल मंडळाने केला. या ‘सॉफ्टवेअर’मुळे मंडळाला मोठे सहकार्य झाले. पेयजल प्रणाली मजबूत करणे हेच या ‘सॉफ्टवेअर’चे उद्दिष्ट आहे. हैदराबादसह अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत ‘ओसीडब्लू’ याचा उपयोग करत आहे.

असे काम करते ‘सॉफ्टवेअर’
हे ‘सॉफ्टवेअर’ पूर्णत: उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ‘डाटा’च्या आधारावर काम करते. यासाठी पाईपलाईनची रुंदी, लांबी, कालावधी, पाण्याचा दबाव इत्यादींचा सुयोग्य ‘डाटा’ आवश्यक आहे. सोबतच किती वेळा पाईपलाईनमध्ये ‘लिकेज’ झाले हेदेखील सांगावे लागते. ‘जीएसआय मॅपिंग’मध्ये संबंधित ‘डाटा’ टाकल्या जातो. त्यानंतर संभाव्य ‘लिकेज’ स्थळाची माहिती कळते. जेथे ‘लिकेज’ असल्याचे कळते, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांशी चर्चा करण्यात येते व पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानंतर ‘लिकेज’ची नेमकी माहिती कळते.

विविध शहरांच्या प्रतिनिधींना सादरीकरण
‘रिस्क पायनेट’ या ‘सॉफ्टवेअर’चे विविध शहरे तसेच महानगरपालिकांच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण करण्यात आले. यात चेन्नई, पुणे, नवी मुंबई, बिलासपूर, रायपूर, अकोला, यवतमाळ, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण इत्यादींचे प्रतिनिधी होते. यासोबत भविष्यात मोठ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांनादेखील बोलविण्याची योजना आहे.

Web Title: Now Leakage of Water will find out through software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी