आता चौकशा पुरेत.. सांत्वनाने आमचा मुलगा परत येणार नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:26 IST2020-08-10T20:25:46+5:302020-08-10T20:26:34+5:30
दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

आता चौकशा पुरेत.. सांत्वनाने आमचा मुलगा परत येणार नाही..
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोझीकोडे विमान अपघातात मृत पावलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध आईवडिलांना सांत्वना देण्यासाठी अनेक जण त्यांच्या भरतनगर येथील घरी पोहचत आहे. दोघाही वृद्धांचे वय ८० च्यावर आहे. मुलाचे अपघातात निधन झाल्याने दोघांवरही दु:खाचे डोंगर कोसळले आहे. अशात त्यांना दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन त्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.
साठे यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर राज्याचे मंत्री, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी वृद्ध दाम्पत्याच्या भेटीसाठी जात आहे. सध्या सुरू असलेले कोरोनाचे संक्रमण आणि दोघांचेही वय लक्षात घेता सांत्वना त्यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. ते दोघेही वारंवार सांगताहेत की, आम्हाला भेटून मुलगा परत येणार नाही. त्यांच्या आरोग्यासाठीसुद्धा ही गर्दी अडचणीची आहे. मुलाच्या अपघाती जाण्याने देशभरात दु:ख व्यक्त होत आहे. पण सांत्वनेच्या नावावर खबरदारी घेणेही गरजेचे आहे.