शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

आता मोबाईलवरच मीटर रिडींगची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:38 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने आता वीज बिलावरील मीटर रिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे आता ग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीज बिल मिळण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देबिलावरील मीटरचा फोटो झाला इतिहासजमा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणकडून वीज ग्राहकांना वीज बिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापूर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरणने आता वीज बिलावरील मीटर रिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे आता ग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीज बिल मिळण्यास सुरुवात झाली आहे.वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून २००८ साली देशात महावितरणने सर्वप्रथम वीज बिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या पद्धतीचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. महावितरणच्या या प्रयोगाचे अनुकरण देशभरातील अनेक वीज वितरण कंपन्या, पाणी पुरवठा संस्था आणि इतरही अनेक संस्थांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. महावितरणकडून ग्राहक सेवा अधिकाधिक तत्पर, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची इत्थंभूत माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज बिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याने ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी सुविधा उपलब्ध आहे. सोबतच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य आहे.गो ग्रीनचा ही उत्तम पर्याय महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणाऱ्या ग्राहकांना ‘गो ग्रीन’चा पर्याय स्वीकारीत ई-बिलचा वापर करणे म्हणजेच झाडांचे आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत करण्यासोबतच मासिक बिलात दहा रुपयांची बचतही आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMobileमोबाइल