शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

आता दर गुरुवारी शासकीय रुग्णालयात थायरॉईडची स्वतंत्र ओपीडी

By सुमेध वाघमार | Updated: March 31, 2023 18:06 IST

फुलपाखराच्या आकाराची ‘थायरॉईड’ ग्रंथि आपली अंतस्त्रावी प्रणालीचा (अँडोक्रिम सिस्टम) एक महत्त्वपूर्ण अंग

नागपूर : थायरॉइडचे प्रमाण वाढत असलेतरी हा असाध्य आजार नाही, त्याचे वेळीच निदान व त्यावर उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते. याच उद्देशाने मेयो, मेडिकलमध्ये मिशन थायरॉईड अभियानांतर्गत दर गुरुवारी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (ओपडी) सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा विशेषत: महिलांना होणार आहे.

फुलपाखराच्या आकाराची ‘थायरॉईड’ ग्रंथि आपली अंतस्त्रावी प्रणालीचा (अँडोक्रिम सिस्टम) एक महत्त्वपूर्ण अंग आहे. ही आपल्या मानेच्या समोर आणि कंठाच्या अगदी खाली असते. यातून निघणारे ‘हार्मोन थायरोक्सिन’ (टी ४) आणि ‘ट्रायओडोथायरोनिन’ (टी ३) शरीरातील प्रत्येक सेल उर्जेचा कसा वापर करतील हे निश्चित करते. याच प्रक्रियेला चयापचय क्रिया म्हटले जाते. जेव्हा थायरॉइड ग्रंथी खूप जास्त हार्माेन तयार करते तेव्हा त्याला ‘हायपोथायरॉईडीझम’ म्हटले जाते.

- साडे तीन लाख महिलांची तपासणी

मनपाच्या ‘माता सुरक्षित तर, घर सुरक्षित’ या अभियानांतर्गत ३ हजार ७४० महिलांची ‘थायरॉईड’ तपासणी करण्यात आली. यात ‘हायपोथायरॉईड’चे ६३४ तर ’हायपर थायरॉईड’चे ४४ रुग्ण आढळून आले.

- एकाच छताखाली सर्व तापसणी

मेडिकलमध्ये दर गुरुवारी थायरॉईडची स्वतंत्री ‘ओपीडी’ असणार आहे. या आजाराच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व तपासणी केली जाईल. ‘ओपीडी’चे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्या हस्ते झाले. यावेळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ.राजेश गोसावी, नोडल अधिकारी डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शरद कुचेवार, थायरॉईड ओपीडी प्रमुख डॉ.भाग्यश्री बोकारे आदी उपस्थित होते.

- १२.३० ते २ या वेळेत उपचार

मेयोमधील थायरॉईड ‘ओपीडी’चे उद्घाटन वैद्यकीय सहसंचालक डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा मुंजे, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. दीप्ती चांद, नोडल अधिकारी डॉ. शोभना, ईएनटीचे विभाग प्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. कोवे. डॉ. माधुरी पांढरीपांडे डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास, डॉ. विपीन ईखार आदी उपस्थित होते. दर गुरुवारी ही ओपीडी दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

- ही लक्षणे दिसताच गाठा ‘ओपीडी’

  • ‘हायपोथायरॉइड’ची लक्षणे : वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे.
  • ‘हायपर-थायरॉइड’ची लक्षणे : हा प्रकार कमी रुग्णांमध्ये आढळून येतो. यात मासिक पाळीत बदल, बद्धकोष्टता, नैराश्य, त्वचा कोरडी होणे, थकवा, थंडी वाजणे, हृदयाचे ठोके कमी होणे, थायरॉईड ग्रंथीमध्ये सूज येणे, वजन वाढणे, खूप जास्त झोप येणे, पोटावर व जीभेमध्ये सूज येणे ही लक्षणे दिसून येतात.
टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर