महावितरणचे वीजदेयक आता ‘मोबाईल’ वर

By Admin | Updated: August 10, 2016 02:32 IST2016-08-10T02:32:43+5:302016-08-10T02:32:43+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे आपल्या ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी आता पुन्हा एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Now the electricity payee of MSEDCL is on 'Mobile' | महावितरणचे वीजदेयक आता ‘मोबाईल’ वर

महावितरणचे वीजदेयक आता ‘मोबाईल’ वर

‘एसएमएस’ : १ लाख ३९ हजार मोबाईल क्रमांकांची नोंदणी
नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण कंपनी महावितरणतर्फे आपल्या ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी आता पुन्हा एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यात महावितरणतर्फे वीज ग्राहकांच्या मोबाईलवर वीज देयकाच्या संदेशासह ‘एसएमएस’ वीज बंद असल्यास त्या कालावधीची माहिती देणारा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे.
परंतु यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये स्वत:च्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचवेळी आतापर्यंत नागपूर परिमंडलातील तब्बल १ लाख ३९ हजार ७८२ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी पूर्ण केली आहे. शिवाय त्यांना महावितरणकडून वीजदेयकाचा एसएमएस पाठविला जात आहे. तसेच महावितरणने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीज वाहिनीची नोंद घेण्यात येणार आहे.
त्यानंतर संबंधित वीजवाहिनीवरील वीजग्राहकांच्या मोबाईलवर वीज बंदबाबतच्या कालावधीची माहिती ह्यएसएमएसह्ण द्वारे कळविण्यात येईल. महावितरणने वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर ह्यएसएमएसह्ण द्वारे वीजग्राहकांना स्वत:चा ई-मेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे.
याशिवाय महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रात ग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the electricity payee of MSEDCL is on 'Mobile'