शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

महत्त्वपूर्ण निर्णय; आता सातबारातील जातिवाचक नोंदणीही वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 07:00 IST

Nagpur News जातिवाचक वस्त्या, पाडे व गावांची नावे बदलविण्यात आल्यानंतर आता सात-बाराच्या उताऱ्यामधील शेतीच्या स्थानिक नावांमध्ये असलेली जातिवाचक नावांची नोंदणी वगळून त्यात सुधारित नोंदणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देमहसूल व वन विभागाला कारवाईचे निर्देश

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जातिवाचक वस्त्या, पाडे व गावांची नावे बदलविण्यात आल्यानंतर आता सात-बाराच्या उताऱ्यामधील शेतीच्या स्थानिक नावांमध्ये असलेली जातिवाचक नावांची नोंदणी वगळून त्यात सुधारित नोंदणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात शासनाने शासन निर्णय जारी करीत महसूल व वन विभागाला यासंदर्भात कारवाई निर्देश देण्यात आले आहेत. (Now the caste registration of agricultural names will also be omitted)

राज्याच्या प्रत्येक ‘साझा’ यामध्ये अधिकार अभिलेखविषयक नोंदवही ठेवण्यात येतात. त्यामध्ये गाव नमुना नंबर ७ ही अधिकार अभिलेखविषयक नोंदवही आहे, तर गाव नमुना नंबर १२ ही पीक पाहणीविषयक नोंदवही आहे. या दोन्ही एकत्रित उताऱ्यास गाव नमुना नंबर ७-१२ चा उतारा, असे संबोधण्यात येते. ७-१२ च्या उताऱ्यातील एका कॉलममध्ये शेतीचे स्थानिक नाव हे जातिवाचक नोंदवले जायचे. राज्यातील बहुतेक गावांमध्ये शेतीचे स्थानिक नाव हे जातिवाचक नोंदवले गेले आहे. पूर्वी पटवारी शेतीची नोंद ही संबंधिताच्या जातीवरून करायचे. त्यामुळे स्थानिक स्तरावर त्या शेतीची ओळख जातिवाचक होऊन ती तशीच कायम राहिली. अलीकडे हे प्रकार कमी झाले असले तरी बहुतेक ठिकाणी अजूनही असल्याचे दिसून येते. त्यामुळे सामाजिक सौहार्द कायम राहून गावात सामाजिक सलोखा स्थापन व्हावा, या उद्देशाने शासनाने ही जातिवाचक नावे वगळून सुधारित नोंद घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

ग्रामपंचायत ठराव घेणार

यासंदर्भात शासनाने कार्यपद्धतीही निश्चित केली आहे. जातिवाचक शेतीचे स्थानिक नाव ही नोंद वगळून त्याऐवजी आवश्यकता वाटल्यास गावातील स्थानिक भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी-नाल्यांशी निगडित नावे देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी गावच्या ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा. त्यास तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक मान्यता द्यावी. त्यानंतर ७-१२ ची नोंद अद्ययावत करण्यात यावी, असा आदेश शासनाने दिला आहे.

- विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश

या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मासिक आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार