शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

पुरुष व वयोवृद्धांसाठी आता ‘आधार सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:54 AM

भरोसा सेलच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आधार सेल स्थापन केला जात आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच मानसोपचार तज्ज्ञ, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अशा तज्ज्ञ मंडळींच्या पॅनलकडून आलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक कलहाची उकल महिला सेलच्या धर्तीवरच करणार काम

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्यातच अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. गैरसमजातून आई-वडील व मूल एकमेकांपासून दुरावताच. बरेचदा ज्येष्ठ पुरुषाला अपमानजनक वागणूक मिळते. दाम्पत्याच्या या विसंवादात वयोवृद्ध मात्यापित्यांची प्रचंड हेळसांड होते. या समस्येची उकल करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयी आधार सेल स्थापन केले जात आहे.पती-पत्नीतील कलह मिटविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले महिला सेल उत्कृष्ट कार्य करत आहे. अनेकांचे संसार तुटण्यापासून वाचत आहे. याशिवाय कौटुंबिक कलहातून निर्माण होणारे गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येतो. याच धर्तीवर नागपूरमध्ये भरोसा सेल सुरू करण्यात आला होता. प्रयोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या भरोसा सेलला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाला.आता भरोसा सेलच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आधार सेल स्थापन केला जात आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच मानसोपचार तज्ज्ञ, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अशा तज्ज्ञ मंडळींच्या पॅनलकडून आलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. यात विशेष करून पुरुषांना आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. अनेकदा मुलांकडून किंवा सुनेकडून मिळणारी अन्यायकारक वागणूक वयोवृद्ध दाम्पत्य समाजात कुणापुढेच मांडू शकत नाही. कायद्याची मदत कुटुंबाच्या बदनामीमुळे ते स्वीकारत नाही. या स्थितीत त्यांना आधार सेलमधून योग्य मार्गदर्शन व त्यांच्या सुना व मुलांचे समुपदेशन केले जाणार आहे. पुरुषही बरेचदा पत्नीकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त असतात. याशिवाय वयात आलेली मुले यांचंही समुपदेशन या आधार सेलमध्ये मोफत केलं जाणार आहे. टोकाचा निर्णय घेण्यापूर्वीच दोन्ही बाजूंना योग्य समुपदेशन करून चुका कशा टाळाव्यात याबाबत याचे मार्गदर्शन या आधार सेलमध्ये केले जाणार असल्याचे महिला सेलमधील सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस