शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

आता मेयोमध्येही लवकरच सुरू होणार हृदय, मेंदूरोगावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:12 IST

केंद्र शासनाकडे प्रस्ताव : सध्या मेडिकलला पाठवावे लागतात रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बैठी जीवनशैली, तंबाखूचे व्यसन, तणाव, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव यामुळे हृदय व मेंदूरोगाचे रुग्ण वाढत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) या दोन्ही आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण येतात; परंतु विशेषज्ञ नसल्याने या रुग्णांना मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची वेळ येते. हे थांबविण्यासाठी हृदय व मेंदूरोग विभाग निर्माण करण्यासाठी मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये दिवसेंदिवस रुग्णांचा व्याप वाढत आहे. या रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरूपातील शस्त्रक्रिया होत असल्या तरी सुपर स्पेशालिटी विभाग नाही. नागपुरात केवळ मेडिकलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदय व मेंदूरोग विभाग आहे; परंतु या दोन्ही विभागाची ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने व आकस्मिक विभाग नसल्याने रुग्ण अडचणीत येतात. मेयोमध्ये या आजाराचे जे गंभीर रुग्ण येतात त्यांना मेयोमध्येच उपचाराखाली ठेवून पुढील उपचारासाठी तेथील डॉक्टर सुपरच्या डॉक्टरांशी संपर्क साधतात; परंतु यात जाणारा वेळ व उपचारात होत असलेला उशीर लक्षात घेऊन अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी सुपर स्पेशालिटी विभागाचा प्रस्ताव तयार केला. 

३०-३० बेडचे असणार दोन विभाग डॉ. चव्हाण यांनी 'लोकमत'ला सांगितले, केंद्र शासन पुरस्कृत योजनेतून हृदय व मेंदू रोग विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. याला मंजुरी मिळाल्यास जवळपास १०० कोटी निधीतून ५०० बेड हॉस्पिटल इमारतीवर हे दोन विभाग सुरू केले जातील. विभागात प्रत्येकी २० बेडचा वॉर्ड व १० बेडचा आयसीयू असेल. मनुष्यबळ व आवश्यक यंत्रसामग्री उभी केली जाईल. इतरही सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यासाठी भविष्यात स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रयत्न असेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली हिरवी झेंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मेयो व मेडिकलच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी डॉ. चव्हाण यांनी रुग्णालयात हृदय व मेंदूच्या रुग्णांची वाढलेली संख्या याची माहिती देत त्यांना अद्ययावत उपचार देण्यासाठी हृदयरोग व मेंदूरोगासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याकडे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली. 

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटल