शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

कुख्यात सुमित ठाकूरकडून ५० हजाराच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Published: November 08, 2023 2:38 PM

सुमित ठाकूर व त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांची दहशत, नेकांना खंडणीसाठी धमक्या

नागपूर : कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर याच्याविरोधात नागपूर पोलिसांनी कायद्याचा विळखा घट्ट केला आहे. त्याच्याविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई झाली असताना त्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. त्याने ५० हजाराच्या खंडणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

गणेश उर्फ गुही आनंदराव चाचेरकर (३९, गोरेवाडा) असे तक्रारदाराचे नाव आहे. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते गोरेवाडा फॉरेस्ट गेटजवळ उभे होते. गणेशची सुमित ठाकूरसोबत जुनी ओळख आहे. सुमित गणेशला तेथे भेटला व त्याने ५० हजारांची मागणी केली. गणेशने पैसे नसल्याचे सांगताच सुमित भडकला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व ‘मला ओळखत नाही का? तुला मला पैसे तर द्यावेच लागतील, नाही तर ठार मारेन’ अशी त्याने धमकी दिली.

सुमित ठाकूरच्या कारवायांबाबत चांगलीच माहिती असल्याने गणेशने तेथून पाय काढता घेतला. १६ ऑक्टोबर रोजी सुमितने तीन तरुणांचे शस्त्रांच्या धाकावर अपहरण करून लुटले व तो पोलिसांच्या परत रडारवर आला. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होऊन कारवाई झाल्यावर गणेशने हिंमत दाखविली व गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुमितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भितीपोटी अनेकांकडून तक्रार नाही

सुमित ठाकूर व त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांची दहशत आहे. त्यांनी अनेकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या आहेत. त्यांच्या भितीपोटी बहुतांश जण पोलिसांत जाण्याचे टाळतात. त्यामुळे तक्रारीचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरExtortionखंडणी