नागपुरातील सहा डॉक्टर व आठ फार्मासिस्टना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 09:48 PM2020-06-26T21:48:33+5:302020-06-26T21:49:42+5:30

खासगी रुग्णालयांना निक्क्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही खासगी रुग्णालये, फार्मासिस्ट या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने सहा डॉक्टर व आठ फार्मासिस्ट यांना प्रथम सूचना देण्यात आली, परंतु त्यानंतरही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता नोटीस बजावण्यात आली आहे.

Notice to six doctors and eight pharmacists in Nagpur | नागपुरातील सहा डॉक्टर व आठ फार्मासिस्टना नोटीस

नागपुरातील सहा डॉक्टर व आठ फार्मासिस्टना नोटीस

Next
ठळक मुद्देक्षयरोगाच्या रुग्णाची नोंद न करणे भोवले : उपसंचालक आरोग्य विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी रुग्णालयांना निक्क्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, काही खासगी रुग्णालये, फार्मासिस्ट या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात उपसंचालक आरोग्य विभागाच्यावतीने सहा डॉक्टर व आठ फार्मासिस्ट यांना प्रथम सूचना देण्यात आली, परंतु त्यानंतरही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता नोटीस बजावण्यात आली आहे. राष्टÑीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम नागपूर शहरामध्ये २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर क्षयरोग निदानाच्या अद्ययावत सोयी, संपूर्ण औषधोपचार नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत आताच्या निक्क्षय प्रणालीमध्ये प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी केली जात आहे. कें द्र सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी कार्यक्रमांतर्गत होणे बंधनकारक केले आहे. २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे धोरण कें द्र सरकारतर्फे ठरविण्यात आल्याने ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती होणे, त्यांचे प्रमाण कमी करणे व त्यामुळे होणारे मृत्यू रोखणे हा उद्देश आहे. म्हणूनच रुग्ण खासगी स्तरावरील असो किंवा शासकीय स्तरावरील असो, डॉक्टर, हॉस्पिटल यांना निक्क्षय सॉफ्टवेअरमध्ये क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास भारतीय दंड संहिता कलम २६९ व २७०च्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. औषध विक्रेत्यांसाठी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या परिपत्रकाप्रमाणे औषधे व प्रसाधने कायदा १९४५ मध्ये सुधारणा करून क्षयरोगावरील औषधांच्या विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणेही बंधनकारक केले आहे. नागपुरात निम्म्याहून अधिक क्षयरोगाचे रुग्ण खासगीमध्ये उपचार घेत आहेत. परंतु काही डॉक्टर याची नोंद करीत नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसापूर्वी याबाबत उपसंचालक आरोग्य विभागाने शहरातील सहा डॉक्टरांना व आठ फार्मसिस्टना प्रथम सूचना दिली. मात्र, त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले नाही. यामुळे या १४ जणांवर कारवाई करण्याचे पाऊल प्रशासनाने उचलल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Notice to six doctors and eight pharmacists in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.