नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 21:42 IST2019-09-09T21:40:30+5:302019-09-09T21:42:11+5:30

लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

Notice of High Court to Navneet Rana | नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

नवनीत राणा यांना हायकोर्टाची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार अंबाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे त्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. परंतु, त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, अनुसूचित जातीवर अन्याय झाला. ही बाब लक्षात घेता त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अंबाडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. संदीप चोपडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Notice of High Court to Navneet Rana