शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

दादासाहेब कुलगुरूच नव्हे तर सामाजिक विद्यापीठही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 6:47 PM

लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.

ठळक मुद्देजयंती महोत्सवात वेदप्रकाश मिश्रा यांचे गौरवोद्गारमाजी मंत्री वसंतराव धोत्रे अध्यक्षस्थानी

आॅनलाईन लोकमतनागपूर : लोकसेवेचा वसा घेत दादासाहेब काळमेघ यांनी नागपूर विद्यापीठाला सामाजिक चेहरा दिला. दादासाहेब कुलगरु तर होतेच मात्र ते चालतेबोलते सामाजिक विद्यापीठही होते, असे गौरवोद्गार भारतीय आयुर्र्विज्ञान परिषदेच्या अकॅडमिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री वसंतराव धोत्रे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ.रामचंद्र शेळके, अ‍ॅड. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते.माजी मंत्री धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुखानंतर दादासाहेब काळमेघ यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद काळमेघ यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या ओजस्वी इतिहासाला उजाळा देत तिथे कारकीर्द गाजविणाऱ्या  अध्यक्षांच्या कामाला यावेळी सलामी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भारसाकळे यांनी केले. दादासाहेब काळमेघ यांच्या जयंतीउत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाºया विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंदा नांदूरकर तर पाहुण्यांचे आभार हेमंत काळमेघ यांनी मानले.