बोगस कपडे, वॉचेसच नव्हे तर नागपुरात बनावट टॉयलेट क्लिनरचीदेखील विक्री
By योगेश पांडे | Updated: February 26, 2024 18:57 IST2024-02-26T18:57:03+5:302024-02-26T18:57:44+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

बोगस कपडे, वॉचेसच नव्हे तर नागपुरात बनावट टॉयलेट क्लिनरचीदेखील विक्री
नागपूर : इतवारीत बनावट ब्रॅंडेड कपडे, घड्याळे, गॉगल्स यांच्यानंतर आता चक्क बनावट टॉयलेट क्लिनरचीदेखील विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी एका दुकानात धाड टाकून या रॅकेटचा भंडाफोड केला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
इतवारीत एका दुकाना लायझॉल व हार्पिक या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सच्या नावाखाली बनावट वस्तूंची विक्री होत होती. याची माहिती कंपनीचे देखरेख अधिकारी अलताफ रोशन शेख (५०) यांना मिळाली. त्यांनी लकडगंज पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी नेहरू पुतळ्याजवळील दुकानात धाड टाकली असता तेथे बनावट माल आढळून आला.
पोलिसांनी कैलासराम आडतदास राखेजा (४२, देवीयोग अपार्टमेंट, चिखली लेआउट, कळमणा), विजय राधाकिशन वाधवानी (५२, कुकरेजा नगर, जरीपटका) व वेणू मोटवानी (४२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तेथून बनावट मालदेखील जप्त केला.