शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

शरीरच नव्हे स्वप्नही झाले हद्दपार!

By admin | Updated: January 31, 2015 02:10 IST

रोज चुरगळल्या जाणाऱ्या देहाला पुन्हा-पुन्हा लालीपावडर लावून बाजारात मांडणारी बाई ही समाजाच्या दृष्टीने वारांगना असली तरी ...

नरेश डोंगरे/शफी पठाण नागपूररोज चुरगळल्या जाणाऱ्या देहाला पुन्हा-पुन्हा लालीपावडर लावून बाजारात मांडणारी बाई ही समाजाच्या दृष्टीने वारांगना असली तरी अन् दिवस-रात्रींच्या पिंजऱ्यात सुकणं-गळणं-तुटणं हे तिचे प्राक्तन असले तरी काळाचे घाव सोसून दगड झालेल्या तिच्या शरीरामागे आईचे एक हळवे मनही असते आणि या मनात ती आपल्या चिल्यापिल्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे स्वप्नही रंगवत असते़ नागपुरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील वारांगनांच्या मनातील स्वप्नही याहून वेगळे नव्हते़ परंतु कायद्याला इतक्या वर्षांनी अचानक ही वस्ती शहरावरचा कलंक असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी एका क्षणात साऱ्या वारांगनांना हद्दपार करून टाकले़ पण, या कारवाईने नुसते शरीर हद्दपार झाले नाही तर येथील वारांगनांनी पाहिलेले मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नही हद्दपार झाले आहे़ आता कुठे आशावादाची अक्षरे उमटायला लागली असताना पोलिसांनी जणू या विद्यार्थ्यांची पाटीच फोडून टाकली आहे़ ही फुटलेली पाटी या विद्यार्थ्यांना कुठले दिवस दाखवील याचा विचार आता समजानेच करणे गरजेचे आहे़ ‘चिंतेश्वर’ला चिंता, शिक्षकही झाले अस्वस्थनैतिकतेचा हवाला देत पोलिसांनी वारांगनांवर कारवाईचा आसूड ओढल्याने त्याचा फटका वारांगनांच्या मुलांनाही बसला आहे. आईसोबत त्यांनी आपली वस्तीच नव्हे तर शाळाही सोडली आहे. त्यामुळे एकीकडे शाळा ओसाड पडली आहे तर दुसरीकडे शाळा सोडून निघून गेलेल्या ३००वर मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्रज राजवटीपासून नागपुरात गंगाजमुना वस्ती आहे. वारांगनांच्या या वस्तीतील बहुतांश जणी हौसेने नव्हे तर विवशतेने हा धंदा करीत आहेत. सुमारे १००० वारांगनांची ३ ते १३ वयोगटातील २ हजार मुले या वस्तीत असून, त्यातील ४५० ते ५०० मुल-मुली वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकतात. यातील सर्वाधिक १७५ मुले-मुली चिंतेश्वर प्राथमिक शाळेत, तर १३१ मुले-मुली शरणस्थान या निवासी शाळेत शिकतात़ अन्य मुले मुली आजूबाजूच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जायच्या़ शरणस्थानमधील मुले वगळता इतर सर्वच शाळांमधील मुलांनी गेल्या आठ दिवसांपासून शाळांमध्ये पाय ठेवलेला नाही. कारण त्यांना शाळाच नव्हे तर गाव सोडून जावे लागले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तरार्ध सत्र सुरू असताना गंगाजमुनातील ३०० वर मुले अचानक शाळा सोडून गेल्यामुुळे संबंधित शाळांमधील शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत.