उत्तर नागपुरातील तडीपार जेंटिल सरदार पाचपावलीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:41 IST2018-04-01T00:41:23+5:302018-04-01T00:41:34+5:30
उत्तर नागपुरातील तडीपार गुन्हेगार परमजीत ऊर्फ जेंटिल गुरुचरणसिंह लोहिया (४०) याला शनिवारी दुपारी पाचपावली परिसरातून अटक करण्यात आली.

उत्तर नागपुरातील तडीपार जेंटिल सरदार पाचपावलीत सापडला
ठळक मुद्देदोन वर्षांसाठी होता तडीपार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर नागपुरातील तडीपार गुन्हेगार परमजीत ऊर्फ जेंटिल गुरुचरणसिंह लोहिया (४०) याला शनिवारी दुपारी पाचपावली परिसरातून अटक करण्यात आली.
गुन्हेगारी कृत्यासाठी त्याला डीसीपी राहुल माकणीकर यांनी २०१७ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. परंतु शनिवारी सकाळी जेंटील पाचपावली परिसरात सर्रास फिरतांना आढळून आला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी पोलिसांना जेटिंलला अटक करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांच्या चमूने वैशालीनगर चौकात जेंटिलला पकडले. पाचपावली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम १४२ अंतर्गत कारवाई केली आहे.