शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

नागपूरमधून नऊ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:41 PM

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून ९ उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅड. विजया बागडे,अ‍ॅड. सुरेश माने, खुशबू बेलेकर यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून ९ उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.नागपूर लोकसभा मतदार संघात शुक्रवारी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मनोज कोठूजी बावणे (अपक्ष), प्रभाकर कृष्णाजी सातपैसे (अपक्ष), अ‍ॅड. विजया दिलीप बागडे (आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडिया), रुबेन डॉमिनिक फ्रान्सिस (अपक्ष), कार्तिक गेंडालाल डोके (अपक्ष), अ‍ॅड. सुरेश तातोबा माने (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), वनिता जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), खुशबू मुकेश बेलेकर (बळीराजा पार्टी), योगेश कृष्णराव आकरे-सीपीआय (एम) रेड स्टार या उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सादर केली.नागपूर लोकसभा मतदार संघातून यापूर्वी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अब्दुल करीम अब्दुल गफार पटेल (केआयआर) एआयएमआयएम, उल्हास शालिकराम दुपारे(अपक्ष) व दीपक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत एकूण १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्याचप्रकारे रामटेक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. नाम निर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये चंद्रभान बळीराम रामटेके (राष्ट्रीय जन सुराज्य पक्ष), कॉम्रेड बंडू रामचंद्र मेश्राम (भाकपा(माले)रेड स्टार) यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्वीकारले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर