‘एज्युकेशनिस्टा’ शैक्षणिक प्रदर्शनात नामांकित संस्था
By Admin | Updated: November 2, 2014 00:58 IST2014-11-02T00:58:54+5:302014-11-02T00:58:54+5:30
देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे ‘एज्युकेशनिस्टा’ प्रदर्शन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये सुरू असून विद्यार्थी व पालकांची गर्दी आहे.

‘एज्युकेशनिस्टा’ शैक्षणिक प्रदर्शनात नामांकित संस्था
आज अखेरचा दिवस : विद्यार्थी व पालकांची गर्दी
नागपूर : देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे ‘एज्युकेशनिस्टा’ प्रदर्शन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये सुरू असून विद्यार्थी व पालकांची गर्दी आहे.
पत्रपरिषदेत आयोजक अभिनेते व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पवन शंकर यांनी सांगितले की, संस्थेने पहिल्या प्रदर्शनाचे आयोजन नागपुरात केले आहे. देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे सर्वोत्तम शिक्षण, निवासी संस्था व करिअर पर्यायांची माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एकाच छताखाली देण्यात येत आहे.
नागपूर देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील लोकांची क्रयशक्ती जास्त आहे. पाल्याला नामांकित संस्थांमध्ये शिक्षण देण्याची अनेकांची इच्छा असतानाही उत्तम संस्थांची इत्थंभूत माहिती उपलब्ध होत नसल्याने ते निराश होतात. अशांसाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. पत्रपरिषदेत एज्युकेशनिस्टा प्रदर्शनाच्या उपाध्यक्षा नमिता कोहोक, शैक्षणिक तज्ज्ञ प्रशांत उगेमुगे, एज्युकेशनिस्टा व फॅशननिस्टा प्रदर्शनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी युक्ती शंकर, शैक्षणिक तज्ज्ञ जवाहर सुरीशेट्टी आणि युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशन फाऊंडेशनचे विभागीय अधिकारी रेयान परेरा, कोहिनूर अमेरिकन स्कूल, खंडाळाचे प्रमुख कॅ. अलोक पाराशर, सागर स्कूल, अलवरच्या जयश्री बन्सालिया, संस्कृती स्कूलच्या सेन आणि विविध संस्थांचे संस्थापक, संचालक आणि प्राचार्य उपस्थित होते. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ७ या वेळात सुरू राहील. (वाणिज्य प्रतिनिधी)