शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी नोडल स्कूलचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 19:33 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. घसरत्या पटसंख्येबरोबरच गुणवत्ताही घसरत चालली आहे. त्यामुळे शाळांवर होणारा, शिक्षकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने शासनाने ‘नोडल स्कूल’ हा एक नवीन फंडा आणला आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्रातील एका नोडल स्कूलची माहिती आठवड्याभरात सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.

ठळक मुद्देशासनाने मागितली नोडल स्कूलची माहिती : शिक्षकांचेही होऊ शकते समायोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. घसरत्या पटसंख्येबरोबरच गुणवत्ताही घसरत चालली आहे. त्यामुळे शाळांवर होणारा, शिक्षकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने शासनाने ‘नोडल स्कूल’ हा एक नवीन फंडा आणला आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्रातील एका नोडल स्कूलची माहिती आठवड्याभरात सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.नागपूर जि.प.च्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या ३८७ शाळा आहे. यात ० ते ५ पटसंख्येच्या शाळा ३४ आहे. तर ६ ते १० पटसंख्येच्या शाळा ९४ आहे. शासन कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जाळे पसरत असल्यामुळे पालकांचा इंग्रजी शाळांकडील कल वाढत आहे. त्याचा फटका जि.प.च्या शाळांना बसतो आहे. पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थी टिकवून राहावे म्हणून गणवेश ते पाठ्यपुस्तक व मध्यान्ह भोजन आदी पुरविण्यात येते. त्याचाही परिणाम पटसंख्येवर होताना दिसत नाही. जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १५३८ वर शाळा असून, येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शाळांना १३६ केंद्रामध्ये विभागण्यात आले आहे. केंद्र्रनिहाय ज्या शाळांची गुणवत्ता कमी आहे, अशा शाळांचे नोडल स्कूलमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक केंद्रातून एक नोडल शाळा निवडून अशा शाळांची माहिती शासनाला देण्यासंदर्भात, नुकत्याच अलिबाग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या बैठक ीत निर्णय घेण्यात आला आहे. नोडल स्कूल म्हणजे काय?नोडल स्कूल म्हणजे प्रत्येक केंद्रातील एक आदर्श शाळा. ज्या शाळेची पटसंख्या चांगली असेल, इमारत व्यवस्थित असेल, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असेल, अशा शाळांची नोडल स्कूल म्हणून निवड करण्यात येणार आहे. त्या शाळांना आणखी सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करू शकेल या पद्धतीने शाळांना विकसित करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांना समायोजित करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर