शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाचा विजय रथ कुणीही रोखू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:17 IST

भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा : एखादी पोटनिवडणूक हरल्याने फरक पडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाने या पाच वर्षात जेवढे विजय मिळविले तेवढे विजय गेल्या ७० वर्षात कुणालाही मिळविता आले नाहीत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही ते शक्य झाले नाही. भाजपाने ८० टक्के निवडणुका जिंकून विक्रम केला आहे. अशात एखादी पोटनिवडणूक हरलो म्हणून भाजपाची हवा उतरली असे होत नाही. कार्यकर्त्यांनो आत्मविश्वास ठेवा. भाजपाचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी मुंबई येथे पक्षाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी खासदार अशोक नेते, रामदास तडस, डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकरराव देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, डॉ. परिणय फुके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याच्या समारोपात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दोन जागा हरलो. त्या जागा भाजपाच्या नव्हत्याच. त्यावेळी विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ज्या त्रिपुरामध्ये ९० टक्के लोक ख्रिश्चन आहेत, तेथे भाजपाने लाल बावटाची २५ वर्षांची सत्ता उलथून फेकली. दोन वर्षांपूर्वी त्रिपुरामध्ये अमित शहांच्या स्वागतासाठी विमानतळावर सहा लोक अले होते. तेथे परिश्रम घेतल्याने कमळ फुलले. मात्र, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा हरताच पुन्हा चर्चा सुरू झाली. तेथे बसपा व सपा एकत्र आल्याने अनपेक्षित निकाल आला.पण चिंतेचे कारण नाही. त्याच गोरखपूरमध्ये भाजपाचा महापौरही जिंकला आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरला.राज्यात आपण नगर परिषदांपासून ते ग्राम पंचायतीपर्यंत जिंकलो आहोत. राज्यात भाजपाचे नगरसेवक २७२ वरून २००० झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये १२०० सदस्य झाले आहेत. थेट सरपंचाच्या निवडणुकीत भाजपाचे तब्बल १० हजार सरपंच विजयी झाले आहेत. मुळात आपण या यशाचा उत्सवच साजरा केला नाही. त्यामुळे अधूनमधून होणारा एखादा पराभव चिंतेचे वातावरण निर्माण करतो. आता पक्षाच्या स्थापना दिनी मुंबईत उत्सव साजरा करू. महामेळाव्यात गर्दी करून असे विराट दर्शन घडवा की ते पाहून कार्यकर्ते आपोआप कामाला लागतील, असेही त्यांनी सांगितले. राज्यात ९७ हजार पैकी ८४ हजार बूथ स्थापन करण्यात आले आहेत व यापैकी ८१ हजार बूथची पडताळणी पूर्ण झाली आहे. राज्यात पक्षाचे एवढे मोठे संघटन उभारण्यात आले आहे. स्थापना दिवसासाठी प्रत्येक जिल्ह्याने पाच हजार कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट स्वीकारले आहे. खरे तर हा आकडा कमीच आहे. जेव्हा कुठलीही व्यवस्था नव्हती तेव्हा देखील भाजपाने लाखोंचे मोर्चे काढले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक बूथवरून किमान १० लोक यावेत, तेव्हाच मुंबईत विराट दर्शन घडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा