‘नोबेल’ विजेते कैलास सत्यार्थी संघमंचावर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:54 IST2018-10-01T23:53:18+5:302018-10-01T23:54:13+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारासाठी कार्यरत असलेले व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

‘नोबेल’ विजेते कैलास सत्यार्थी संघमंचावर येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारासाठी कार्यरत असलेले व ‘नोबेल’ पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका, देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, पाकिस्तानकडून होणाºया कुरापती, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
स्वयंसेवकांमध्ये उत्साह
देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा पाचवा तर पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोरदचा अखेरचा विजयादशमी उत्सव असेल. संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे.