शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कळमना बाजारपेठ बंद करण्याचे आदेश नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:55 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.

ठळक मुद्दे प्रशासक ’सचिव राजेश भुसारी : बाजार बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनी दिली.बाजारात ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व कामगारांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याचे भुसारी म्हणाले.या सर्व पार्श्वभूमीवर कळमना बाजाराचे व्यवहार काही दिवसासाठी बंद करण्याची मागणी विविध असोसिएशनकडून पुढे आली आहे, हे विशेष.भुसारी म्हणाले, दररोज बाजाराची साफसफाई करण्यात येत आहे. सर्व बाजाराच्या असोसिएशनच्या बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना ग्राहकांची गर्दी कमी करण्याचे आणि स्वच्छता ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. त्यानंतरही धान्य, भाजीपाला आणि फळे बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे ही चिंतेची बाब आहे. कलम १४४ नंतरही बाजारात ग्राहकांची होणारी गर्दी पाहता फळ बाजार बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि अडतिया असोसिएशनने स्वत:हून घेतला आहे. शहरातील किरकोळ विक्रेते फळांच्या खरेदीसाठी बाजारात येत नसल्याने फळे विकणार कुणाला, असा त्यांचा सवाल आहे. आम्ही बाजार सुरू ठेवण्यास सांगितला होता. पण अडतिया असोसिएशने स्वत:हून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच बाब भाजीपाला बाजाराशी संबंधित आहे. शहरातील सर्वच आठवडी बाजार बंद झाल्याने भाज्यांची विक्री कमी झाल्याची त्यांची ओरड आहे. त्याकरिता कृृषी उत्पन्न बाजार समितीचा नाईलाज आहे. सध्या भाजीपाला बाजार पहाटे ४ ते दुपारी १२ पर्यंत सुरू आहे. या असोसिएशनने शनिवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भुसारी म्हणाले, बाजाराची पाहणी करताना कलम १४४ चे गांभीर्य लोकांमध्ये दिसून येत नाही. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारच्या संचारबंदीनंतर राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या आहेत. आवक कमी झाली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात मिळाव्यात म्हणून शासनाने बाजार बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर