गांजा तस्करांचा आविर्भाव... ‘सैंय्या भये कोतवाल, अब डर काहे का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 18:51 IST2022-04-08T18:50:56+5:302022-04-08T18:51:31+5:30

Nagpur News गांजा तस्करांनी पोलिसांनाच फितवल्याने त्यांना कुणाचाच धाक राहिलेला नसल्याचे वास्तव आहे.

No fear police to cannabis smugglers ... | गांजा तस्करांचा आविर्भाव... ‘सैंय्या भये कोतवाल, अब डर काहे का’

गांजा तस्करांचा आविर्भाव... ‘सैंय्या भये कोतवाल, अब डर काहे का’

ठळक मुद्देपोलिसांत इथे - तिथे पेरले भागीदार

नरेश डोंगरे

नागपूर : परप्रांतातून गांजाची तस्करी करणे सोपे व्हावे यासाठी तस्करांनी चक्क पोलिसांनाच फितवले आहे. इथल्याच नव्हे तर ‘तिथल्या’ही पोलिसांना त्यांची गांजा तस्करी तसेच खरेदी-विक्रीत भागीदारी दिली आहे. पोलीस सोबत असल्याने ‘सैंय्या भये कोतवाल, अब डर काहे का’ अशा आविर्भावात ते बिनधास्त वावरत होते.

इव्हेन्ट मॅनेजमेंट, कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट आणि नाइट शो असे एकमेकांत गुंतलेले आकर्षक व्यवसाय करण्याच्या आडून ‘पोलीस बॉय’ म्हणून वावरणारा अभिषेक पांडे दोन वर्षांपासून गांजाची तस्करी करीत होता. अवघ्या १९ वर्षांचा पांडे आणि त्याचे साथीदार कमालीचे निर्ढावले आहेत. ओडिशाच्या संभलपूर भागात गांजाचे मोठे पीक घेतले जाते. तेथे फारच स्वस्त दरात सर्रास गांजा मिळतो. ज्या भागात गांजा मिळतो, तेथून संभलपूर किंवा समोरच्या रेल्वेमार्गापर्यंत येण्यासाठी दोन चेक पोस्ट लागतात. गांजा तस्करीसाठी हा भाग ओळखला जात असल्याने त्या चेक पोस्टवर प्रत्येक वाहन चेक केले जाते. वाहन पकडले की त्या वाहनाचा ड्रायव्हर आणि वाहनमालकाचा परवाना नेहमीसाठी तिकडचे पोलीस करतात. त्यामुळे गांजा तस्कर भ्रष्ट वृत्तीच्या काही पोलिसांना हाताशी धरतात. ते सोबत असल्यामुळे गांजाने भरलेले आपले वाहन चेक पोस्टच नव्हे तर सीमेबाहेर सुखरूप पोहोचते. इकडे नागपूर डिव्हिजनच्या रेल्वे (आरपीएफ) पोलिसांची साथ असल्याने हा गांजा मुलींच्या बॅगमधून नागपुरात आणला जात होता. हा गांजा आरपीएफचा पीएसआय रामसिंग मिना याच्या शांतीनगरातील घरात ठेवला जायचा. पोलीस अधिकाऱ्याच्या घरून गांजाचे घबाड असल्याने ते पुरते सुरक्षित राहत होते. संशयाला किंवा कारवाईची कसलीही भीती त्यामुळे नसायची.

३०-७०चा फार्म्यूला

ओडिशात केवळ दीड ते दोन हजार रुपये किलोने गांजा विकत मिळतो. नागपुरात मात्र तोच गांजा १५ हजार रुपये किलोने विकला जातो. दहापट फायदा असल्याने पांडे आणि त्याची टोळी आरपीएफच्या पोलिसांना चक्क ३० टक्के कमिशन देत होते. ८ ते ९ हजारांच्या गांजाची खेप पीएसआय मिनाच्या घरातून बाहेर काढताच त्याला तीन हजार रुपये कमिशन मिळायचे.

अभद्र युती करणारा पोलीस गजाआड

गांजा तस्करांसोबत भेटगाठ घडवून आणणारा आणि कमिशनखोरीत सहभागी असलेला आरपीएफचा पोलीस कर्मचारी दीपक कुमार यालाही गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी जेरबंद केले. हा अनेक गांजा तस्करांच्या निरंतर संपर्कात होता, असे त्याच्या कॉल डिटेल्सवरून उघडकीस आले आहे. दरम्यान, या दोघांनाही आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.

----

Web Title: No fear police to cannabis smugglers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस