दारू पाजली नाही, म्हणून हात तोडण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 20:34 IST2021-10-26T20:32:41+5:302021-10-26T20:34:06+5:30
Nagpur News दारू पाजण्यास नकार दिला, म्हणून दोन भामट्यांनी एका तरुणाचा हात तोडण्याचा प्रयत्न केला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

दारू पाजली नाही, म्हणून हात तोडण्याचा प्रयत्न; दोघांवर गुन्हा दाखल
नागपूर : दारू पाजण्यास नकार दिला, म्हणून दोन भामट्यांनी एका तरुणाचा हात तोडण्याचा प्रयत्न केला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कबीर दशरुजी बोरबन (वय २९) असे जखमी तरुणाचे नाव असून, तो रामेश्वरी चौकाजवळ राहतो.
१७ ऑक्टोबरला मध्यरात्री कबीर देवनगर चौकात मित्रांची वाट बघत उभा होता. आरोपी हिमांशू राईकवार (वय २४) त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्याने कबीरला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. कबीरने नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर आधीच दुखापत असलेल्या हातावर जोरदार मारहाण करून त्याचा हात तोडण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्याने बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले.
हात फॅक्चर झाल्यामुळे कबीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून रुग्णालयातून परतल्यानंतर कबीरने या घटनेची तक्रार बजाजनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---