मनपाने आपल्याच स्पोर्ट कॉम्प्लेक्सला सील ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 22:57 IST2021-06-02T22:56:44+5:302021-06-02T22:57:20+5:30

NMC sealed own sports complex सुभाष रोडवरील महापालिकेच्या मालकीच्या तुकडोजी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये क्रीडाविषयक घडामोडी व जिम सुरू असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बडगे यांच्या आदेशानुसार मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी स्पोर्ट कॉम्प्लेक्सला सील ठोकले.

NMC sealed own sports complex | मनपाने आपल्याच स्पोर्ट कॉम्प्लेक्सला सील ठोकले

मनपाने आपल्याच स्पोर्ट कॉम्प्लेक्सला सील ठोकले

ठळक मुद्देक्रीडाविषयक घडामोडी व जिम होते सुरू : व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवार्ई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सुभाष रोडवरील महापालिकेच्या मालकीच्या तुकडोजी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये क्रीडाविषयक घडामोडी व जिम सुरू असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बडगे यांच्या आदेशानुसार मनपाच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी स्पोर्ट कॉम्प्लेक्सला सील ठोकले. यावेळी मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर उपस्थित होते.

तुकडोजी स्पोर्ट कॉम्प्लेक्स घाटे असोसिएटला चालविण्याचा कंत्राट दिला आहे. कोविड संक्रमणाचा धोका विचारात घेता शहरातील जिम व क्रीडाविषयक घडामोडींना अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. परंतु असे असूनही स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली.

Web Title: NMC sealed own sports complex