कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नितीन राऊत यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 16:35 IST2021-02-20T16:34:30+5:302021-02-20T16:35:40+5:30

Nagpur News पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह १९ फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा २१ रोजी आयोजित केला होता. तो कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे.

Nitin Raut's son's wedding reception canceled | कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नितीन राऊत यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नितीन राऊत यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह १९ फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा २१ रोजी आयोजित केला होता. तो कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे.
डॉ. राऊत यांनी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, त्यांचे चिरंजीव कुणाल यांचा विवाह आकांक्षा यांच्याशी झाला आहे. नवपरिणीत दांपत्याचा स्वागत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी नागपुरात आयोजित केला होता. मात्र येथील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता, हा सोहळा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून नागपूरसह विदर्भात कोरोनाचे प्रस्थ झपाट्याने पुन्हा वाढते आहे.

 

Web Title: Nitin Raut's son's wedding reception canceled