नितीन राऊत यांचा अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:19 IST2019-07-01T14:16:16+5:302019-07-01T14:19:25+5:30
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नितीन राऊत यांचा अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाचे अपश्रेय स्वत:कडे घेत त्यांनी या राजीनाम्यात, आपण कमी पडल्याचे नमूद केले आहे. आपली चमू निवडणुकांपूर्वी सहा महिने अगोदर परिश्रम घेत होती मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. सबब आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत असे म्हटले आहे.
लोकसभा निकालानंतर देशभरातून काँग्रेस पदाधिकारी राजीनामे देत आहेत, त्यात आता नितीन राऊत यांची भर पडली आहे.