Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
By योगेश पांडे | Updated: October 10, 2024 01:00 IST2024-10-10T00:58:46+5:302024-10-10T01:00:55+5:30
Ratan Tata Passed Away: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशाला उद्योगक्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेणारे रतन टाटा यांच्या निधनानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे. देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.
"देशाचे महान सुपुत्र रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. तीन दशकांहून अधिक काळ रतन टाटाजींसोबत अतिशय घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीचा साधेपणा, त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांचाही ते करत असलेला आदर हे सगळे गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले होते. त्यांच्याकडून मला आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. देशातील सर्वात मोठे उद्योगपती असल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महान देशभक्त असण्यासोबतच ते तत्त्वांचे पालन करणारेही होते. ते जितके मोठे उद्योगपती होते तितकेच ते एक संवेदनशील समाजसेवक होते. त्यांच्या निधनाने भारताने एक आदर्श आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. हा देश रतन टाटा यांना कधीही विसरू शकत नाही. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो," अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.