नितीन गडकरी यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 09:21 PM2022-07-22T21:21:33+5:302022-07-22T21:21:59+5:30

Nagpur News संपूर्ण देशात १३ ते १५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या 'हर घर तिरंगा ' मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

Nitin Gadkari launched 'Har Ghar Tiranga' campaign | नितीन गडकरी यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात 

नितीन गडकरी यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात 

googlenewsNext

नागपूर : संपूर्ण देशात १३ ते १५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या 'हर घर तिरंगा ' मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. यावेळी केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता व जिल्हाधिकारी आर. विमला उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घरावर लावण्यात येणारा झेंडा त्यांच्याहस्ते फडकावून हा प्रारंभ करण्यात आला. नागपूर शहरात सात लाख घरांमध्ये 'हर घर तिरंगा ' अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात बारा लाख तिरंगा लावण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्तता करण्याबाबत यावेळी नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी आर. विमला यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Nitin Gadkari launched 'Har Ghar Tiranga' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.