शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सगळ्या गोष्टींवर फार बारकाईने लक्ष आहे"; विधिमंडळात पाऊल टाकताच नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:00 IST

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे

Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नागपुरात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडले आहे. तिन्ही पक्षांनी जुन्या नेत्यांना बाजूला ठेवत अनेक नव्या चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी दिली आहे. कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनाही मंत्रि‍पदाची संधी देण्यात आली आहे. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळताच तळकोकणात जल्लोष करण्यात आला. त्यानंतर आता अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.  सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणेही यंदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता राणे बंधुंची जोडी सरकारमध्ये दिसणार आहे. सोमवारी मंत्री म्हणून नितेश राणे यांनी पहिल्यादाच विधिमंडळात पाऊल टाकलं. यावेळी माध्यमांशी बोलताना . माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

"मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात पाऊल टाकलं आहे.  माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आणि वरिष्ठ नेत्यांनी आमच्यासारख्या हिंदुत्ववादी तरुण कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र, कोकण आणि हिंदू समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी १०० टक्के कशी पार पाडता येईल या दृष्टीने पाऊले टाकणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"विरोधकांनी ईव्हीएम विरोधात लोकसभेच्या नंतर आंदोलन केले असते लोकांना त्यांच्यावर विश्वासही बसला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे. व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटलं नाही. आता हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडले तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. विरोधक जे काही करत आहेत ते हिंदू समाज खुल्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या या आंदोलनाला काही अर्थ नाही," असंही नितेश राणेंनी म्हटलं.

यावेळी माध्यमांनी तु्म्हाला संजय राऊत यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत का असा सवाल नितेश राणे यांना केला. यावर बोलताना त्यांचे मन एवढं मोठं नाही असं नितेश राणे म्हणाले. "महाराष्ट्रातून शुभेच्छा येत आहेत. पण ते एवढ्या मोठ्या मनाचे नाहीत. महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्याव्यात एवढ्या मोठ्या मनाचे ते नाहीत. आम्ही त्यांना ३९ वर्षे ओळखतो. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं. सगळ्या गोष्टींवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असा इशारा नितेश राणे यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा