शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पार्वतीच्या स्वरांनी निनादली ‘सरगम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:38 AM

पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले.

ठळक मुद्देसरगम ग्रुुपचे आयोजन : नवोदित गायकांनीही गाजवला मंच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले. निमित्त सरगम ग्रुुपतर्फे आयोजित ‘सुरो की सरगम’ या संगीतमय कार्यक्रमाचे. एन. उन्नीकृष्णन यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात नवोदित गायकांनी पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचे खरचं सोने केले. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम...’ या गीताने पार्वतीने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर ‘बेदर्दी बालमा...’, ‘रूके रूके से कदम...’ असे सलग दोन गीत तिने आपल्या गोड आवाजात सादर केले. यानंतर मंचावर आले एन. उन्नीकृष्णन. ‘नागपूरचा येसूदास’ अशी ओळख असलेल्या एन. उन्नीकृष्णन यांनी आपल्या खास शैलीत ‘सुनयना...’ हे गीत सादर केले. पार्वती आणि प्रतीक जैनच्या ‘मेघा मेघा रे...’ या गाण्याने श्रोत्यांची विशेष दाद मिळवली. पार्वती व डॉ. निशिकांत लोखंडे यांच्या ‘मेरे ढोलना...’ या गीताने वन्समोअर मिळवले. या कार्यक्रमात सृष्टी काकानी, डॉ. प्रवीण जाधव यांच्या गाण्यांनीही माहोल केला. या गोड गळयाच्या गायकांना कि-बोर्डवर परिमल जोशी, गिटार- रॉबीन विलियम्स, बेस गिटार-अक्षय हरले, आॅक्टोपॅड-अंकित देशकर, ढोलक-पंकज यादव या वादकांनी सुरेल सहसंगत केली. निवेदन पुष्पा आनंद यांनी केले.-अन् मंचावर अवतरला मेहमूदगायनाच्या कार्यक्रमात नृत्याचा योग तसा फारसा येत नाही. पण, ‘सुरो की सरगम’ याला अपवाद ठरले. प्रतीक जैन हा गायक गुमनाम चित्रपटातील ‘हम काले हैं तो क्या हुवा...’ हे गाणे गायला मंचावर आला तोच मुळात मेहमूदच्या वेशभूषेत. टी-शर्ट, लुंगी आणि ‘हाफ मिशी’ अशा पेहरावातील सावळया वर्णाच्या प्रतीकने आपल्या नृत्य व गायनातून सभागृहात धम्माल उडवून दिली.