वाईन शॉपसह नऊ दुकाने सील()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST2021-05-19T04:08:49+5:302021-05-19T04:08:49+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी तीन झोनमध्ये ९ दुकाने सील केली. गांधीबाग झोन अंतर्गत प्रेसिडेंट वाईन ...

Nine shops sealed with wine shop () | वाईन शॉपसह नऊ दुकाने सील()

वाईन शॉपसह नऊ दुकाने सील()

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी तीन झोनमध्ये ९ दुकाने सील केली. गांधीबाग झोन अंतर्गत प्रेसिडेंट वाईन शॉप, कमाल रेडिमेड, पिंटू सावजी जुनी आणि भव्य साडी, आदी दुकानांना गांधीबाग झोनच्या सहायक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत शहीद चौक इतवारी मधील जैन होजेरी स्टोअर्स, चंदन गारमेन्ट व वामन थ्रेडस फॅक्टरी शांतीनगर तसेच मंगळवारी झोनमधील पूनम चेंबर छावणी येथील मॅक डोनल्ड रेस्टॉरेन्ट आणि अंजुमन कॉम्प्लेक्स सदर येथील बेल्जीयम वाफले दुकानाला सील करण्यात आले.

पथ्काने २८ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २ लाख् २५ हजाराचा दंड वसूल केला. पथकाने पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही करण्यात आली.

Web Title: Nine shops sealed with wine shop ()