हिंगण्यात नऊ तर काटाेलमध्ये चार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:45+5:302021-01-08T04:22:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा/काटाेल/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ते कायम आहे. जिल्ह्यात साेमवारी (दि. ...

हिंगण्यात नऊ तर काटाेलमध्ये चार रुग्ण
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा/काटाेल/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ते कायम आहे. जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) विविध ठिकाणी करण्यात आलेल्या काेराेना टेस्टमध्ये हिंगणा तालुक्यात नऊ, काटाेल तालुक्यात चार तर कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात एका जणाला काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हिंगणा तालुक्यात साेमवारी १३४ जणांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, यातील नऊ जण काेराेना संक्रमित असल्याचे आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३,८३९ झाली आहे. यातील ३,६३३ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. शिवाय, ९६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वानाडाेंगरी येथील चार, इसासनी येथील दाेन तर हिंगणा, रायपूर व टाकळघाट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
काटाेल तालुक्यात ७८ नागरिकांची चाचणी करण्यात आली असून, त्यातील चाैघे काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चारही रुग्ण काटाेल शहरातील रहिवासी आहेत. यात शहरातील सावरगाव रोड, साठेनगर, चौबे लेआऊट व पंचवटी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. कांद्री (कन्हान) येथील काेविड सेंटरमध्ये ३७ नागरिकांची टेस्ट करण्यात आली असून, यातील एकाला काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कन्हान परिसरातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या ८७२ झाली असून, यातील ८३५ रुग्णांनी काेराेनावर मात केली तर २५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरात सध्या १२ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. याेगेश चाैधरी यांनी दिली.