नऊ जुगाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST2020-12-08T04:09:09+5:302020-12-08T04:09:09+5:30

नरखेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात नऊ ...

Nine gamblers arrested | नऊ जुगाऱ्यांना अटक

नऊ जुगाऱ्यांना अटक

नरखेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात नऊ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १८,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ६) करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नरखेड परिसरात गस्तीवर असताना त्यांना खापरी शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली आणि जुगार खेळला जात असल्याचे आढळून येताच धाड टाकून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १८,४०० रुपये राेख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. अटकेतील आराेपींची नावे कळू शकली नाही. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस हवालदार राजेंद्र सनाेडिया यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Nine gamblers arrested