नऊ जनावरांची सुटका

By Admin | Updated: August 20, 2016 02:29 IST2016-08-20T02:29:02+5:302016-08-20T02:29:02+5:30

पोलिसांनी मौदा तालुक्यातील चाचेर शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले.

Nine animals released | नऊ जनावरांची सुटका

नऊ जनावरांची सुटका

आरोपीस अटक : अडीच लाखांचा ऐवज जप्त
रामटेक : पोलिसांनी मौदा तालुक्यातील चाचेर शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईमध्ये नऊ जनावरांची सुटका करीत आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रियाज अब्दुल सैयद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या व आशिफ युसूफ शेख (३०) असे फरार आरोपीचे नाव आहे. दोघेही कामठी येथील रहिवासी आहेत. रामटेक पोलिसांचे पथक मौदा तालुक्यात गस्तीवर होते. दरम्यान, जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी चाचेर शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्यात एमएच-४०/वाय-४१५८ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात नऊ जनावरे कोंबली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यात या जनावरांची वाहतूक विना परवानगी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी वाहनातील दोघांना अटक करून वाहनासह जनावरे जप्त केली. या कारवाईमध्ये ४५ हजार रुपये किमतीची जनावरे आणि दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nine animals released