नागपुरात रात्रीची जबावबंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:23+5:302021-04-01T04:09:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कुठलेही स्थानिक निर्बंध १ एप्रिलपासून राहणार नाहीत. राज्य शासनाने २७ मार्च रोजी जारी ...

नागपुरात रात्रीची जबावबंदी कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कुठलेही स्थानिक निर्बंध १ एप्रिलपासून राहणार नाहीत. राज्य शासनाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ रात्रीची जमावबंदी राहणार आहे. स्थानिक निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यात येणार आहे. याबाबतचे दिशानिर्देश बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी जारी केले.
असे आहेत दिशानिर्देश
- रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर पडता येणार नाही.
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला प्रत्येकी १ हजार रुपये दंड केला जाईल.
- सर्व सार्वजनिक स्थळे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.
- मास्कशिवाय फिरणाऱ्याला ५०० रुपये तर रस्त्यावर थुंकणाऱ्याला १ हजार रुपये दंड आकारला जाईल.
- सर्व सिनेमाघरे, मॉल्स, सभागृह, रेस्टॉरंट रात्री ८ नंतर बंद राहतील.
- जाहीर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी.
- लग्नात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
- अंत्यसंस्काराला २० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
- मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे या सर्व उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी व्हावी.
- कंटेनमेंट झोनबाबत स्थानिक प्रशासनाने दिलेले आदेश लागू राहतील.
- सरकारी कार्यालयांतील गर्दी कमी करा. महत्त्वाच्या कामांसाठी येणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.