नागपुरात नवविवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:41 AM2020-05-23T00:41:30+5:302020-05-23T00:43:36+5:30

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.

Newlywed commits suicide in Nagpur | नागपुरात नवविवाहितेची आत्महत्या

नागपुरात नवविवाहितेची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.
प्रियंका सौरभ पटेल (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती सुरेंद्रगड गुप्ता चौक येथे राहत होती. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रियंकाने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या सासरच्या नातेवाईकांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
प्रियंकाचे माहेर गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडीत आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये अर्थात अवघ्या तीन महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता. प्रियंकाचा पती खासगी वाहन चालक म्हणून काम करतो. घटनेच्या वेळी तो घरी नव्हता. तिने आत्महत्या केल्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात सविस्तर चौकशी सुरू असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री दिली. तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Newlywed commits suicide in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.