नागपुरात छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 22:13 IST2020-10-28T22:12:12+5:302020-10-28T22:13:40+5:30
Newlywed Woman commits suicide , Crime newsनवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शाहिन शेख मोमिन शेख (२१) रा. टिपु सुलतान चौक हिने २१ ऑक्टोबरला रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. शाहिनचे मोमिन अलीसोबत लग्न झाले होते. तपासात पोलिसांना मोमिन आणि त्याचे कुटुंबीय शाहिनचा छळ करीत असल्याची माहिती मिळाली. आत्महत्येच्या काही वेळापूर्वी शाहिनने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोमिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला माहेरी जाण्यास मनाई केली. त्यांनी शाहिन आणि तिची बहिण शबानासोबत वाद घातला. आरोपींच्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे शाहिनने आत्महत्या केली. त्या आधारे पोलिसांनी मोमिन शेख, मो. अली, जोहरा बेगम, मीर अली, समीर अली आणि सिमरन शेख विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला.