शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महामारी आल्यास १५० दिवसांत नवी लस; पुढील पाच वर्षांत कॅन्सरवर लस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:15 IST

Nagpur : कोरोना काळात भारताने स्वतःची प्रतिबंधक लस विकसित करून सुमारे ४० लाख लोकांचे जीव वाचवले. त्या अनुभवाच्या बळावर पुढील कोणतीही महामारी उ‌द्भवल्यास भारत १५० दिवसांत नवी लस विकसित करून ती देशभर उपलब्ध करू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना काळात भारताने स्वतःची प्रतिबंधक लस विकसित करून सुमारे ४० लाख लोकांचे जीव वाचवले. त्या अनुभवाच्या बळावर पुढील कोणतीही महामारी उ‌द्भवल्यास भारत १५० दिवसांत नवी लस विकसित करून ती देशभर उपलब्ध करू शकतो, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि कोविड व्हॅक्सीन टास्क फोर्सचे माजी सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वतीने सोमवार 'रिसर्च डे' आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अरोरा मुख्य वक्ता म्हणून उपस्थित असताना ते 'लोकमत'शी बोलत होते. 'एम्स' बिलासपुरचे अध्यक्ष असून 'इन्क्लेन ट्रस्ट इंटरनॅशनल'चे अध्यक्ष डॉ. अरोरा म्हणाले की, कोविड-१९ काळातील अनुभवामुळे भारताची महामारी प्रतिसाद क्षमता मूलभूत पातळीवर बदलली आहे. नॅशनल टेक्निकल एडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे सदस्य असल्याने कोविड काळात व्हॅक्सीन धोरणावरही मार्गदर्शन केले.

भारत आता शून्यातून सुरुवात करत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, देशाकडे विविध अत्याधुनिक लस प्लॅटफॉर्म तयार अवस्थेत आहेत. यामध्ये 'एमआरएनए', 'डीएनए', 'व्हायरल व्हेक्टर', 'इनॅक्टिव्हेटेड व्हायरस', 'लाइव्ह अटेन्युएटेड', 'प्रोटीन सबयुनिट' आणि 'व्हायरस-लाइक पार्टिकल' प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.

भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक

कोविड काळात भारताने एकही लस आयात केली नाही, ही आत्मनिर्भरतेची मोठी कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. आज भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असून, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी किमतीत मोठ्या प्रमाणात लसी पुरवतो.

संशोधन म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा

डॉ. अरोरा यांनी जैववैद्यकीय संशोधनाला केवळ आरोग्याचा विषय न मानता राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्याशी जोडले. महामारी एका रात्रीत अर्थव्यवस्था कोलमडवू शकते. संशोधन क्षमता ही संरक्षण सज्जतेइतकीच महत्त्वाची आहे, असा इशारा त्यांनी दिला.

पुढील पाच वर्षांत कॅन्सरवर लस?

सध्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी 'एचपीव्ही' लस उपलब्ध असून, ती आता भारतात तयार होत आहे. त्यामुळे तिची किंमतही कमी झाली आहे. याशिवाय देशात विविध प्रकारच्या कॅन्सरवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. पुढील पाच वर्षात कॅन्सरविरोधी लस उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करत डॉ. अरोरा म्हणाले, हे यश मिळाले तर लाखो जीव वाचू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : New vaccine in 150 days; Cancer vaccine in five years?

Web Summary : India can develop a new vaccine in 150 days if a pandemic occurs. Cancer vaccine possible in five years due to ongoing research. India's vaccine production is globally significant and cost-effective, enhancing national security.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य