शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नागपुरात १४०० मीटरचा नवीन ‘टॅक्सी-वे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 10:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएअर इंडियाच्या एमआरओपासून बांधकामाला प्रारंभ १० महिन्यात पूर्ण होणार

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ३.२५ कि़मी.च्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून १४०० मीटरच्या नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम २० दिवसांपूर्वीच सुरू झाले असून १० महिन्यात पूर्ण होणार आहे.

४३.५० कोटींची गुुंतवणूकमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) या कामाच्या ई-निविदा दोन महिन्यांपूर्वी काढल्या होत्या. मुंबई येथील आरपीएस इन्फ्रा कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. ४३ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट आहे. कंपनीने बांधकाम सुरू केले आहे. मिहानमध्ये एअर इंडियाच्या एमआरओलगत इंदमार एमआरओचे दोन हँगर जूनमध्ये तयार होणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत नवीन ‘टॅक्सी-वे’चे बांधकाम कंपनीला पूर्ण करायचे आहे. इंदमार एमआरओच्या बाजूला अनिल अंबानी यांचा धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क उभा राहणार आहे. १४०० मीटरचा ‘टॅक्सी-वे’ पार्कपर्यंत राहील. नवीन दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानांची संख्या वाढणार असून हँगरमध्ये विमान ठेवण्यासाठी जागा राहणार नाही. ही शक्यता ओळखून १४०० मीटरच्या ‘टॅक्सी-वे’ला जोडून विमानांच्या पार्किंगसाठी एमएडीसी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकूण ४.६५ कि़मी.चा ‘टॅक्सी-वे’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून एअर इंडियाच्या एमआरओपर्यंत ‘एमएडीसी’ने जवळपास ३.२५ कि़मी.चा ‘टॅक्सी-वे’ची उभारणी पूर्वीच केली आहे. एअर इंडियाचे विमान दुरुस्तीसाठी विमानतळापासून थेट एमआरओमध्ये येत आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंगच्या २५ विमानांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या शिवाय एअर इंडियाने विमानांच्या दुरुस्तीसाठी स्पाईस जेट या विमान कंपनीशी करार केला आहे. यानुसार या कंपनीच्या दोन विमानांची दुरुस्ती एमआरओमध्ये होत आहे. एअर इंडिया अन्य कंपन्यांशी करार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानांची संख्या वाढणार आहे.मिहान प्रकल्पात विमानाचे देखभाल आणि दुरुस्ती केंद्र (एमआरओ) उभारण्यासाठी देशविदेशातील कंपन्यांकडून विचारणा होऊ लागली आहे. मिहानमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आहेत. एम्स प्रकल्पापुढील रस्ता चार पदरी करण्यात येत असून ७.५ कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर