शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

विधानसभा निवडणुकीनंतर कचरा संकलनाची नवी यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:51 PM

शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदोन कंपन्यांची नियुक्ती करणार : तीन कंपन्या टेक्निकल बीडमध्ये पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे, यासाठी शहराचे झोनच्या आधारावर दोन विभागात विभाजन अर्थात दोन पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. टेक्निकल व आर्थिक बीडची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबाबतचा प्रसताव लवकरच स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. समितीच्या मंजुरीनंतर सभागृहाची मंजुरी घेतली जाईल. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे.सध्या कनक रिसोर्सेस कंपनीकडे शहरातील घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी आहे. प्रति टन १४३६ रुपये दराने महापालिका या कंपनीला बिल देते. कनकनेही कचरा संकलनासाठी पुन्हा निविदा भरली होती. परंतु नियम व शर्तीत अपात्र ठरविण्यात आले. कनक कंपनीची २९० वाहने व १५५० कर्मचारी शहरात कार्यरत आहेत. नवीन कंपनी आल्यास या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.शहराचे झोन क्रमाक १ ते ५ व झोन क्र्रमांक ६ ते १० असे दोन पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले आहे. दोन्ही पॅकेजसाठी कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. एका पॅकेजची जबाबदारी एका कंपनीकडे देण्याचा फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. एकाच कंपनीला दोन पॅकेजचे काम करणे शक्य होणार नाही. नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कंपन्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत कंपन्यांना यंत्रणा उभारण्याला सुरुवात करावयाची आहे. कनककडे कार्यरत कर्मचाऱ्यांना फिटनेस व कार्यक्षमतेच्या आधारावर सामावून घेण्यासंदर्भात शिफारस केली आहे.शहरातील कचरा संकलनासाठी पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. परंतु तांत्रिक बीडच्या आधारावर मे. ए.जी. एन्वायरो, ए टू झेड व बीव्हीजी कंपनीला टेक्निकल बीडमध्ये पात्र ठरविण्यात आले आहे. फायनान्शियल बीडमध्ये बीव्हीजीने एका पॅकेजमध्ये प्रति टन १६६५ रुपये तर पॅकेज दोनसाठी १८०० रुपये प्रति टन अशी तयारी दर्शविली आहे. दोन्ही पॅकेज कमी दराचे आहेत. परंतु या कंपनीला एकाच पॅके जचे काम दिले जाणार आहे. दुसऱ्या पॅकेजसाठी कमी दराच्या निविदेवर चर्चा केली जाणार आहे.कनकचे बीड उघडलेच नाहीकनक रिसोर्सेस व मनपा प्रशासन यांच्यात अतिरिक्त बिल देण्याच्या मुद्यावरून प्रकरण न्यायालयात गेले होते. यात महापालिकेच्या बाजूने निर्णय आला. त्यामुळे महापालिका प्रशासन व पदाधिकारी पुन्हा कनकला काम देण्यास इच्छुक नव्हते. तसेच कनकला असलेल्या शर्ती व अटींची पूर्तता करता आलेली नाही. कनकने १६०० रुपये प्रति टन दराने काम करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र या कंपनीचे बीड उघडण्यात आले नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न