शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

नवीन रेती धोरणाला हायकोर्टात आव्हान ; उत्तर सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:02 IST

Nagpur : नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कन्हान येथील व्यावसायिक कृष्णकुमार अग्रवाल यांनी नवीन रेती धोरणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिकेवरील सुनावणीनंतर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाचे सचिव, राज्याच्या महसूल व वन विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वेकोलि आणि वस्तू व सेवा कर आयुक्तालय यांना नोटीस जारी करून दहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील अॅड. चेतन ढोरे यांनी नवीन रेती धोरण अवैध असल्याचा दावा केला. राज्याच्या महसूल व वन विभागाने ८ एप्रिल २०२५ रोजी निर्णय जारी करून नवीन रेती धोरण लागू केले आहे. हे धोरण ठरविताना मागणी व पुरवठा, भरपाई आदींचा सखोल अभ्यास करण्यात आला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवून सर्वेक्षण अहवाल तयार केला. याशिवाय, केंद्रीय पर्यावरण विभागाद्वारे जारी मार्गदर्शकतत्त्वांसह पर्यावरण संरक्षण कायदा व नियमांचे वादग्रस्त धोरणामुळे उल्लंघन झाले आहे. संपूर्ण धोरण अस्पष्ट स्वरुपाचे आहे. परिणामी, रेतीचे अवैध उत्खनन वाढून नद्या व पर्यावरणाची कधीही भरून निघणार नाही अशी हानी होण्याची शक्यता आहे, असे अॅड. ढोरे यांनी सांगितले. 

रद्द करण्याची मागणी

वादग्रस्त रेती धोरण रद्द करण्यात यावे आणि कायदे व नियमानुसार नवीन धोरण लागू करण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : High Court Challenges New Sand Policy; State Ordered to Respond

Web Summary : The Nagpur High Court has challenged the new sand policy. Notices were issued to various departments, including environment and revenue. The petitioner claims the policy is illegal, lacks proper study, and violates environmental laws, potentially leading to environmental damage.
टॅग्स :nagpurनागपूर