शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरसाठी नवीन नियमावली

By admin | Updated: May 27, 2014 01:49 IST

राज्यभरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्स अधिकृत करून घेण्यासाठी सरसावलेल्या राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमावली तयार करून दिली आहे. या नियमावलीनुसार आता

नागेश घोपे/ वाशिम

राज्यभरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्स अधिकृत करून घेण्यासाठी सरसावलेल्या राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमावली तयार करून दिली आहे. या नियमावलीनुसार आता प्रति टॉवर किमान ३० हजार रूपये प्रशासकीय शुल्क भरून सर्व टॉवर अधिकृत करण्यात येणार आहेत. शासनाची बंदी असतानाही राज्यभरातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये मोबाईल टॉवर्सचे जाळे उभे झाले आहे. त्यापैकी बहुतांश टॉवर अनधिकृत आहेत. या मोबाईल टॉवर्सबाबत अनेक ठिकाणी तक्रारी होत्या. त्यामुळे मोबाईल टॉवर्सचे नेमके काय करायचे, याबाबतच्या स्पष्ट सूचना नगरपालिका अथवा महापालिकांना नव्हत्या. आता मात्र राज्य शासनाने त्यासंबंधीचा आदेश काढला आहे. शासनाच्या नव्या नियमांमुळे वाटेल तेथे मोबाईल टॉवर्स उभारण्याला आता आळा बसणार आहे. नियोजित मोबाईल टॉवर, बांधकामाचा नकाशा, टेरेसवरील बांधकामासाठी इमारत पूर्णत्वाचा दाखला अथवा संमती पत्राची किंवा मंजुरी नकाशांची साक्षांकित प्रत, परवानगीसाठी महापालिकेत नोटरी केलेले ना-हरकत प्रमाणपत्र, जर अपार्टमेंट कंडोयानियम असेल तर त्यामध्ये कायदेशीर मालक असलेल्या ७0 टक्के सदनिकाधारकांचे नोटरी केलेले ना-हकरत प्रमाणपत्र आदी बाबी टॉवर उभारताना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. अपार्टमेंट मालक, सोसायटीशी केलेले करारपत्र, डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनचे मोबाईल टॉवरसाठीचे प्रमाणपत्र आणि याच विभागाचे रेडीएशनबाबतचे प्रमाणपत्रही लागणार आहे. तसेच इमारत १५ मीटरपेक्षा अधिक उंच असल्यास महापालिकेच्या अग्निशमन दलाची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. मोबाईल टॉवरच्या परवान्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडेल. मोबाईल टॉवरसाठीचा परवाना पाच वर्षांसाठी राहील. प्रत्येक परवान्यासाठी ३0 हजार रुपयांचे परवाना शुल्क भरावे लागणार असून, बांधकाम उभारणीसाठी आवश्यक विकास शुल्क हे त्या विभागातील रेडीरेकनरच्या दरावर अवलंबून असेल.