हायकोर्टात सोमवारपासून नवीन रोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:37+5:302021-01-08T04:21:37+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या सोमवारपासून नवीन रोस्टर लागू होणार आहे. यासंदर्भात बुधवारी नोटीस जारी करण्यात ...

हायकोर्टात सोमवारपासून नवीन रोस्टर
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या सोमवारपासून नवीन रोस्टर लागू होणार आहे. यासंदर्भात बुधवारी नोटीस जारी करण्यात आली. नवीन रोस्टरमध्ये जनहित याचिकांची जबाबदारी दोन न्यायपीठांकडे विभागून देण्यात आली आहे.
नवीन रोस्टरनुसार, न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्याकडे दिवाणी रिट याचिका, दिवाणी जनहित याचिका, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील्स, न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्याकडे फौजदारी जनहित याचिका, फौजदारी रिट याचिका, लेटर्स पेटेन्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्याकडे फौजदारी अपील्स तर, न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांच्याकडे प्रथम अपील, कुटुंब न्यायालय अपील, अवमानना अपील व याचिकांचे कामकाज राहील. एक सदस्यीय न्यायपीठांमधील न्या. विनय देशपांडे यांना दिवाणी रिट याचिका, दिवाणी व फौजदारी रिव्हिजन अर्ज, न्या. अनुजा प्रभुदेसाई यांना प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, न्या. स्वप्ना जोशी यांना द्वितीय अपील, किरकोळ दिवाणी अर्ज, नियमित जामीन अर्ज, न्या. रोहित देव यांना अटकपूर्व जामीन अर्ज, फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज तर, न्या. पुष्पा गणेडीवाला यांना फौजदारी अपील्स व सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतच्या अर्जांचे कामकाज सांभाळावे लागेल.