शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला ‘न्यू लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:23 PM

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणांसह केलेल्या नूतनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा संकुल नव्या स्वरूपात सज्ज झाले आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळासाठी सुविधा : आकर्षित स्टेडियम, सुशोभित परिसर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरासह मुख्य स्टेडियममध्ये आवश्यक सुधारणांसह केलेल्या नूतनीकरणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणामुळे येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा संकुल नव्या स्वरूपात सज्ज झाले आहे.मानकापूर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी प्रशिक्षणात्मक साहित्य-सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. या विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम मागील दशकापूर्वी झाले होते. खेळाडूंना अधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भारतीय रस्ते महासभेच्या अधिवेशनानिमित्ताने विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. यामध्ये इन्डोअर स्टेडियमच्या नूतनीकरणाचाही समावेश आहे. नूतनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला.इन्डोअर स्टेडियमसह परिसरातील विकास कामांमध्ये वृक्षारोपणसह सुशोभिकरण करण्यात आल्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. बाहेरील सर्व मैदानाची दुरुस्ती केल्यामुळे फुटबॉल, सॉफ्टबॉलचा नियमित सराव करणे शक्य झाले आहे. त्यासोबतच खेळाडूंसाठी कायमस्वरूपी प्रसाधनगृह, स्टेडियममध्ये व बाहेरसुद्धा पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वारावर फोटो गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्टेडियमला न्यू लूक देताना आकर्षक रंगसंगती व सजावट पूर्ण करण्यात आली आहे. या नूतनीकरणाच्या कामामुळे विभागीय क्रीडा संकुलाच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा आयोजनासाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.विभागीय क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणाच्या कामासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपविभागीय अभियंता अनिल देशमुख, चंद्रशेखर गिरी, शंकरापुरे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुशोभिकरण व नूतनीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.अशी आहे सुविधा

विभागीय क्रीडा संकुल येथे इन्डोअर स्टेडियममध्ये सात हजार प्रेक्षक बसू शकतील अशी सुविधा असून, दहा बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅस्टिक, व्यायामशाळा, बॉक्सिंग, टेबलटेनिस आदी सुविधा असून, येथे दोन हजार खेळाडू नियमित लाभ घेतात. क्रीडा संकुलामध्ये एशियन बॅडमिंटन, चॅम्पियनशिप, सिनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिप यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात येतात. क्रीडा संकुलातील वातानुकूलित क्षमतेत वाढ करणे, बॅडमिंटन, कास्टिंग नवीन पॅनल बसविणे, खेळाडूंसाठी प्रसाधनगृह तसेच जिम्नॅशियम हॉलच्या नूतनीकरणासाठी महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे या स्टेडियमला नवीन स्वरूप मिळाले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर