नवे पर्व, नवी ऊर्जा

By Admin | Updated: January 2, 2017 01:59 IST2017-01-02T01:59:22+5:302017-01-02T01:59:22+5:30

प्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो.

New Feast, New Energy | नवे पर्व, नवी ऊर्जा

नवे पर्व, नवी ऊर्जा

प्रत्येक वर्षी नव्या वर्षाचे स्वागत करताना आपण नवा संकल्प करतो. कालौघात अनेकदा हे संकल्प सिद्धीस जात नाहीत. पण पुन्हा नव्या जोमाने आपल्या संकल्पपूर्तीसाठी आपण धडपडत राहतो. हा आशावाद कायमच मनात असतो. जुने वर्ष सरले आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस नवा आशावाद, नवी स्वप्ने घेऊन जन्माला आला. बच्चे कंपनीने महाराजबाग आणि फुटाळ्यावर एकत्र येत धम्माल करीत निरोगी आरोग्याचा संकल्प केला. तर काहींनी कुटुंबीयासह उद्यानात जाऊन क्रिकेटचा आनंद घेतला. सकारात्मक संकल्प आणि आशावादाने नागपूरकरांचा पहिला दिवस आनंदी झाला.

Web Title: New Feast, New Energy